fbpx

Home / Blogs / चेहऱ्यावरील मुरूम व पुळ्या जाण्यासाठी काय उपाय करावे?

चेहऱ्यावरील मुरूम व पुळ्या जाण्यासाठी काय उपाय करावे?

Reviewed By:    Dr Dhanraj 64 small   Dr. Dhanraj Chavan

Updated on: 25th August, 2021

चेहऱ्यावरील मुरूम व पुळ्या जाण्यासाठी काय उपाय करावे Clear Skin Pune

चेहर्‍यावरील पुळ्या व मुरूम सौंदर्यात बाधा आणतात, व त्वचा डागाळलेली दिसू लागते ज्यामुळे पुळ्या किंवा मुरूम असणार्‍या लोकांना मुरूम कायमचे कसे काढायचे? (how to get rid of pockmarks permanently), चेहऱ्यावर पुळ्या आल्यावर काय करावे? (how to get rid of acne on face?) असे प्रश्न असतात व सहाजिकच हे लोक चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी घरगुती उपाय व वैद्यकीय उपचार (home remedies and treatments for pimples on face) शोधतात.

चेहर्‍यावर मुरूम व पुळ्या (pimples and pockmarks) येणे ही खूप लोकांमध्ये उद्भवणारी समस्या आहे. त्वचेच्या ह्या समस्या अनेक कारणांनी उद्भवतात, जसेकी, होर्मोनल इंबॅलन्स (hormonal imbalance), मानसिक तणाव (mental stress), आहारात काही पोषणतत्वांची कमी (nutritional deficiencies), तसेच इतर कोणत्या आजारामुळे किंवा काही औषधांमुळे देखील त्वचेवर पुळ्या व  मुरूम येण्याची मुख्य कारणे आहेत. पुळ्यांचे जुने डाग, कांजिण्या आणि काही त्वचारोग. 

हा लेख वाचल्यानंतर ‘चेहऱ्यावरील मुरूम जाण्यासाठी काय करावे? (how to remove acne scars on face)’ व त्वचेवरील पुळ्या घालवण्यासाठी काय करावे (how to treat acne), अशा प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नक्कीच मिळतील.

Table Of Content

  • मुरूम व पुळ्या जाण्यासाठी उपाय (Home remedies for Acne and Pockmarks)
  • मुरूम व फुटकुळ्या जाण्यासाठी वैद्यकीय उपचार (Medical treatments for pimples and pockmarks)
  • Conclusion

मुरूम व पुळ्या जाण्यासाठी उपाय (Home remedies for Acne and Pockmarks)

अँपल सिडार व्हीनेगर (apple cider vinegar)

त्वचेवर लावल्यास, पिंपल्स व पिंपल्सचे डाग (pimples and pockmarks) जाण्यास मदत होते.

मध आणि दालचीनीचे (honey and cinnamon to remove pimples)

मिश्रण करून ते त्वचेला लावल्यास पुळ्या कमी होतात.

अलो वेरा जेल (aloe vera gel as a home remedy for acne and pockmarks)

त्वचेवर चोळल्यामुळे, पुळ्या व मुरूम कमी होण्यास बरीच मदत होते. त्वचेवरील डाग कमी होतात व कांती काही प्रमाणात उजळते.

एक्सफॉलियेशन

(exfoliate to reduce pimples and pockmarks) केल्याने त्वचेच्या मृत पेशी निघून जातात ज्यामुळे अॅक्ने कमी होण्यामध्ये देखील खूप मदत होते व त्वचेवरील डाग जातात आणि कांती उजळते.

फिश ऑइल सप्लिमेंट्स (fish oil supplements) व झिंक सप्लिमेंट्स (zinc supplements)

घेणे हा मुरूम व पुळ्या घालवण्यासाठीचा एक उत्तम उपाय आहे, फक्त कोणतीही सप्लिमेंट्स घेण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

टी ट्री ऑइल

पिंपल्स व मुरूमावर (tea tree oil to remove acne and acne scars) परिणामकारक ठरते. तसेच रोज हिप (rose hip oil to remove blemishes on skin) ऑइल देखील त्वचेवरील डाग घालवण्यासाठी उपयुक्त आहे.

पुळ्या, मुरूम, किंवा त्वचेच्या कोणत्याही समस्या दूर करण्यासाठी त्वचेची निगा राखणे आवश्यक आहे. चेहरा स्वच्छ धुणे, त्वचेला लागणारी पोषणमूल्ये देणे, तसेच खूप पाणे पिणे ज्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण ठीक राहील, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत (skin care, intake of nutrients necessary for the skin, hydration)

हयाचबरोबर योग्य आहार, नियमित व्यायाम, चांगली जीवनशैली व मानसिक तणावाचे नियोजन ह्या गोष्टी त्वचेच्या सौंदर्‍यासाठी महत्वाच्या आहेत (balanced diet, exercise, healthy lifestyle and stress management).

मुरूम व फुटकुळ्या जाण्यासाठी वैद्यकीय उपचार (Medical treatments for pimples and pockmarks)

त्वचेवर लावण्याची क्रीम्स जसेकी रेटीनोइड्स, salicylic acid व अटीबायोटिक्स ह्यांचा पुळ्यांवर चांगला परिणाम होतो. चेहऱ्यावरील मुरूम जाण्यासाठी क्रीम कोणते घ्यावे तसेच पुळ्या घालवण्यासाठी कोणते क्रीम, लोशन किंवा जेल घ्यावी, ह्याबाबत तज्ञाचा सल्ला घेणे चांगले.

पोटात घेण्याची औषधे जसेकी अटीबायोटिक्स व anti-androgens पुळ्या घालवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

Light थेरपी, हा पुळ्या जाण्यासाठीचा एक उत्तम वैद्यकीय उपचार आहे.

E

Acne के लिए Best Medicine | Best Medicine For Acne | ClearSkin, Pune

केमिकल पील

केमिकल पील ह्या उपचार पद्धतीमध्ये एक रासायनिक पदार्थ जसेकी  salicylic acid किंवा glycolic acid त्वचेवर लावला जातो ज्यामुळे त्वचेचे रूप सुधारते. हाच उपचार मुरूम घालवण्यासाठी देखील उपयुक्त ठरतो.

Microdermabrasion

Microdermabrasion ह्या उपचार पद्धतीमध्ये एपिडेरमिस हा त्वचेचा स्तर काढून टाकला जातो, ज्यामुळे मुरूम, तसेच पिंपल्स चे डाग व त्वचेवर इतर कोणत्या कारणाने पडलेले डाग निघून जाण्यास मदत होते.

तर हे होते चेहऱ्यावरील मुरूम व फुटकुळ्या जाण्यासाठी करण्याचे घरगुती उपाय व वैद्यकीय उपचार. तुम्हाला जर पुळ्या किंवा मुरूमांची समस्या असेल, किंवा त्वचेची इतर कोणतीही समस्या असेल आणि तुम्ही त्याबद्दल मार्गदर्शन घेण्यासाठी एखाद्या चांगल्या त्वचारोगतज्ञाच्या शोधात असाल, तर Clear Skin ला नक्की भेट द्या. येथील अनुभवी त्वचारोगतज्ञ तुम्हाला उत्तम सल्ला देतील, योग्य ते उपचार देतील व तुम्हाला पुन्हा एकदा सुंदर आणि निरीगी त्वचा प्राप्त करता येईल.

Do You Know?

Roughly 250 Patients Are Treated

Everyday By These Dermatologists

(You are one click away from flawless skin)

Meet Our Dermatologist!

dr-manali-shah-chief-dermatologist-clear-skin-pune
dr-dhanraj-chavan-md-dermatologist-dermato-surgeon-clear-skin-pune
dr-dhananjay-chavan-founder-dermatologist-clear-skin-pune
dr-sachin-pawar-hair-transplant-surgeon-clear-skin-pune
dr-rajeshwari-patil-skin-specialist-dermatologist-clear-skin-pune
dr-dhruv-chavan-plastic-surgeon-clear-skin-pune

Conclusion

पिंपल्स आणि खड्ड्यांसाठी घरगुती उपाय हे सहज उपलब्ध आणि स्वस्त पर्याय आहेत, ज्यामुळे तुमची त्वचा अधिक ताजीतवानी आणि आरोग्यदायी बनू शकते. या उपायांना तुमच्या दैनंदिन त्वचा काळजीत समाविष्ट केल्यास, तुम्हाला चांगले परिणाम दिसून येतील. तरीही, त्वचेच्या गंभीर समस्यांसाठी त्वचारोगतज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी आणि उपायांसाठी Clear Skin भेट द्या.

Further Reading

Does Laser Work on Scars?

Explore effective laser scar treatments like PRP, microneedling, and CO2 laser at Clearskin Clinic Pune for smoother skin and improved texture.

read more

Cost of Laser Hair Reduction

Explore the benefits, cost factors, and advanced technologies in laser hair reduction. Visit Clear Skin Clinic Pune for expert treatments and smoother skin.

read more

Can you Control Oily Skin?

Find out if coffee causes acne & how it affects your skin. Talk to the experts at Clear Skin Clinic in Pune for personalized acne treatment.

read more

Have thoughts? Please let us know

We are committed not only to treating you, but also educating you.