Melasma in Marathi – Causes, Symptoms, and Treatment
Reviewed By: Dr Dhanraj Chavan
Updated on: 25th May, 2022
मेलास्मा (Melasma) ज्याला क्लोआस्मा (Chloasma) असेही म्हणतात, त्याला मराठीमधे वांग असे संबोधले जाते. वांगाचे डाग ही त्वचेची एक साधारण समस्या आहे जी अनेक लोकांमध्ये आढळते, पण स्त्रीयांमध्ये मेलास्मा होण्याचे प्रमाण आधिक असते, विशेषत: गरोदरपणात हा त्रास होतो. मेलास्मा चे अजून एक प्रमुख कारण म्हणजे हार्मोन्सचे असंतुलन, तसेच, त्वचेला तीव्र उन्हाच्या झळा लागल्यानेही हा आजार उद्भवू शकतो.
मेलास्मा मध्ये त्वचेवर तपकिरी रंगाचे डाग (brown spots or patches on the skin) पडतात. चेहर्यावर, विशेषकरून कपाळ, गाल, नाक आणि हनुवटीवर हे डाग आढळून येतात, ज्याला वांगाचे डाग असे म्हणतात. ह्या लेखामद्धे आपण मेलास्मा होण्याची कारणे, ह्या आजाराची लक्षणे आणि त्यावरील घरगुती उपाय तसेच औषधोपचार ह्यांविषयी जाणून घेणार आहोत.
Table Of Content
- मेलास्मा ची लक्षणे (Symptoms of Melasma)
- मेलास्माची कारणे (Causes of Melasma)
- मेलास्मा वरील उपाय (Melasma Treatment)
- Conclusion
मेलास्मा ची लक्षणे (Symptoms of Melasma)
त्वचेच्या रंगात बदल होणे (skin discolouration) हे मेलास्माचे प्रमुख लक्षण आहे. त्वचेवर वांगाचे डाग दिसून येतात, जे प्रामुख्याने चेहर्यावर पडतात आणि मुख्य म्हणजे हे डाग सममितीय असतात, म्हणजेच, दोन्ही गालांवर अथवा कपाळाच्या दोन्ही बाजूंवर हे डाग दिसून येतात. शरीराच्या इतर भागांवरही वांगाचे डाग पडू शकतात. बर्याच लोकांमध्ये हे डाग मानेवर आणि हातावरही दिसून येतात. ह्या डगांचा कोणताही शारीरिक त्रास होत नाही, जसेकी दुखणे, आग, जळजळ अशी कोणतीही लक्षणे ह्या आजारात जाणवत नाहीत. परंतू, ज्यांना मेलास्मा होतो, त्यांना ह्या डागांची लाज वाटते, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि अशा वेळी हे लोक मेलास्मावरील उपाय शोधू लागतात.
मेलास्माची कारणे (Causes of Melasma)
- त्वचेला तीव्र उन्हाची बाधा झाल्याने मेलास्मा उद्भवू शकतो. विशेषत: युव्ही किरणांचा (UV rays) त्वचेतील मेलनोसाईट्स (melanocytes) वर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे त्वचेवर वांगाचे डाग पडू शकतात.
- हार्मोन्सच्या असंतुलनामुळे (hormonal imbalance) मेलास्मा होतो, विशेषकरून प्रोजेस्टेरोन आणि एस्ट्रोजेन (progesterone and estrogen) ह्या हार्मोन्सशी मेलास्मा निगडीत आहे. त्यामुळे गरोदरपणात, जेंव्हा ह्या दोन हार्मोन्सच्या प्रमाणात चढ-उतार होतात, तेंव्हा मेलास्मा होऊ शकतो. गरोदरपणात उद्भवणार्या वांगाच्या डागांना मास्क ऑफ प्रेग्ंनंसी (mask of pregnancy) असे म्हटले जाते. हार्मोन थेरपी (hormone therapy) मुळे तसेच थायरोईडच्या आजारमुळे (thyroid problems) देखील मेलास्मा होऊ शकतो.
- मानसिक ताण-तणाव हेदेखील वांगाचे एक प्रमुख कारण आहे.
- ज्यांची त्वचा गडद रंगाची आहे (सावळी किंवा काळी), आशा लोकांमध्ये वांग होण्याचे प्रमाण गोर्या लोकांच्या तुलनेत अधिक असते.
मेलास्मा वरील उपाय (Melasma Treatment)
- गरोदरपणामुळे उद्भवणारा मेलास्मा कोणत्याही उपचारांशिवाय निघून जातो. तसेच हार्मोन्सच्या असंतुलनामुळे पडलेले वांगाचे डाग, हार्मोन्स संतुलित झाल्यावर आपले-आपण निघून जातात.
- वांगाचे डाग घालवण्यासाठी क्रीम्स (creams for melasma) अथवा केमिकल पील्सचा (chemical peels) वापरही करता येतो.
- तज्ञाच्या सल्ल्याने, लेसऱ थेरपी (laser therapy), मायक्रोनीडलींग (microneedling), व microdermabrasion सारखे उपचारही घेता येतात, ज्यामधे त्वचेचे काही थर काढून टाकले जातात. ह्यामुळे त्वचेच्या रंगात सुधारणा होते आणि वांगाचे डाग नाहीसे होतात.
- मेलास्मावरील घरगुती उपायांबद्दल बोलायचा झाल्यास ऐलोवेरा जेलचा मसाज परिणामकारक ठरू शकतो.
Best Treatment For Melasma (मेलस्मा/वांग का इलाज करने के लिए सबसे अच्छा उपचार) | (In HINDI)
ह्या उपायाममुळे वांग कायमस्वरूपी जातो असे नाही. हे उपचार घेऊनही कालांतराने मेलास्मा पुन्हा उद्भवू शकतो. हे टाळण्यासाठी, उपचार घेतल्यानंतरही, त्वचेला उन्हापासून सुरक्षित ठेवणे आवश्यक ठरते. वांगाचे डाग कमी करण्यासाठी तसेच त्वचेचा रंग आणि तकाकी सांभाळण्यासाठी त्वचेही नीट काळजी घेणे आवश्याक ठरते. चेहरा, मान आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुणे, त्वचेला उन्हापासून संरक्षण देणे, सर्व जीवनसत्वांनी युक्त असा आहार घेणे, आणि हार्मोन्सचे संतुलन राखण्यासाठी योग्य तो व्यायाम करणे महत्वाचे आहे.
तुम्हाला जर मेलास्माची कोणतीही लक्षणे जाणवत असतील किंवा तुमच्या चेहर्यावरचे डाग वांगाचे आहेत असे तुम्हाला वाटत असेल, तरी कोणताही निष्कर्ष काढण्या आधी त्वचारोग तज्ञाचा सल्ला घ्या (consult a dermatologist) आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती उपचारपद्धती सुरू करा. एखादी तज्ञ व्याक्तीच तुमच्या आजाराचे निदान करू शकेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला योग्य ते उपचार देऊ शकेल.
तुम्ही जर मेलास्मा वर कायमस्वरूपी उपाय शोधत असाल, तर Clear Skin मधील तज्ञांचे मार्गदर्शन घ्या. ते तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतील, तुमच्या आजाराचे योग्य प्रकारे निदान करतील आणि तुम्हाला लागू पडतील असे उपचार करतील. येथे उपचार घेतल्यानंतर तुमचे वांगाचे डाग तर जातीलंच पण तुमच्या त्वचेमधे चांगले बदलही दिसून येतील आणि तुमचे सौंदर्य अधिक खुलून येईल.
Do You Know?
Roughly 250 Patients Are Treated
Everyday By These Dermatologists
(You are one click away from flawless skin)
Meet Our Dermatologist!
Conclusion
मेलास्माचे कारणे मुख्यत्वे हार्मोन्सचे असंतुलन आणि त्वचेला तीव्र उन्हाचा त्रास आहेत. वांगाचे डाग कमी करण्यासाठी विविध उपचार पद्धती उपलब्ध आहेत ज्यात क्रीम्स, केमिकल पील्स, लेसर थेरपी, मायक्रोनीडलींग आणि घरगुती उपायांचा समावेश आहे.
तुम्हाला जर मेलास्माची लक्षणे जाणवत असतील तर त्वचारोग तज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेतल्यास तुमची त्वचा पुन्हा तजेलदार होईल. ClearSkin मध्ये तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन तुमच्या त्वचेच्या समस्यांवर योग्य उपाय मिळवू शकता. आपल्या त्वचेची नीट काळजी घेतल्यास मेलास्मा चे डाग कमी होऊ शकतात आणि त्वचा अधिक सुंदर होऊ शकते.
Further Reading
10 Common Skincare Mistakes You Might Be Making and How to Avoid Them
Discover 10 common skincare mistakes that could harm your skin, from over-cleansing to skipping sunscreen.
Top Treatments for Acne Scars
Discover top treatments for acne scars, from pigmentation solutions to advanced procedures for deep scars.
How to Remove Pigmentation from Face?
How to Remove Pigmentation from Face? Learn effective ways to treat facial pigmentation, from chemical peels to laser therapy.
Top 5 Safe and Effective Hair Removal Methods
In this blog, we will explore the Top 5 Safe and Effective Hair Removal Methods available and help you determine which one is the safest and best suited for your skin.
Have thoughts? Please let us know
We are committed not only to treating you, but also educating you.