Skin Care Tips in Marathi: उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी?
Reviewed By: Dr Dhananjay Chavan
Updated on: 30 July, 2022

उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते कारण, ह्या ऋतुमधील कडक उन्हाचा आणि हवेतील कोरडेपणाचा त्वचेवर परिणाम होतो. तीव्र उन्हामुळे त्वचा लाल होते, काळी पडते, कोरडी होते आणि निस्तेज दिसू लागते.
शरीरातील उष्णता वाढल्यामुळे अनेकांना घामुळे येणे, त्वचेवर पुरळ येणे ह्यांसारखे त्रास होतात, तर काहींना सनबर्नचा (sunburn) त्रास होतो ज्यामधे त्वचेवर काळे डाग पडतात, खाज येते, व सूज येते. बर्याच लोकांना उन्हाळ्यामध्ये मुरूमांचा (acne breakouts in summer) त्रास होतो. हे सगळे विकार टाळण्यासाठी व उन्हाळ्यातही त्वचेचा तजेला टिकवण्यासाठी, त्वचेची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. ह्या लेखात आपण बघणार आहोत, उन्हाळ्यात त्वचेही काळजी घेण्यासाठीचे घरगुती उपाय, मराठीतून (home remedies for summer skin care in marathi).
उन्हाळ्यात त्वचेची काळजी काशी घ्यावी? (Summer Skin Care Tips in Marathi)
उन्हापासून त्वचेचे संरक्षण करणे (sun protection for the skin) अतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी, उन्हात बाहेर पडणार असाल तर छत्री अथवा डोक्याचा रुमाल किंवा टोपीचा वापर करा. डोळ्यांभोवतीची त्वचा चेहर्याच्या इतर त्वचेच्या तुलनेत नाजुक असते, म्हणूनच उन्हात जाताना सन ग्लासेस घाला. तसेच सनस्क्रीनचा वापर करा.
उन्हाळ्यामध्ये खूप मेकअप वापरू नका, कारण त्वचेला श्वास घेऊ देणे महत्वाचे आहे. उन्हाळ्यामध्ये पावडर स्वरुपातील मेकअप उत्पादने वापरणे केंव्हाही चांगले. ह्या ऋतूमध्ये ओठ कोरडे पडतात. त्यांची काळजी घेण्यासाठी (lip care in summer) लिप बामचा वापर करा.
घाम आणि चिकटपणामुळे त्वचेची रंध्रे मोकळी राहत नाहीत. त्यांना मोकळे ठेवण्यासाठी काकडी किंवा आलोवेरा असलेला टोनर (aloe vera based toner) वापरा.
अनेक वेळा उन्हाळ्यात डोळ्यांची तसेच त्वचेचीही आग किंवा जळजळ होते. तसे होत असल्यास, डोळ्यांवर आणि त्वचेच्या त्या भागावर थंड पाण्याच्या पट्ट्या किंवा काकडीचे तुकडे ठेवा. असे केल्याने आग किंवा जळजळ होणे तर थांबतेच पण शरीरातील उष्णताही कमी होते.
चंदन, आमसूल, ताक/दही ह्यांसारखे पदार्थ त्वचेवर लावल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि उष्णतेमुळे होणारे त्वचेचे विकारही होत नाहीत.
त्वचेवर पुरळ किंवा घामुळे आले असल्यास अथवा उन्हामुळे त्वचेची आग होत असल्यास चंदनाचा लेप लावा, कढीलिंबाचा लेप लावा, किंवा ताक, दही अशा थंड पदार्थांचा वापर करा. ह्यामुळे त्वचेला थंड आणि शांत वाटेल व उन्हाळ्यात होणारे त्वचेचे इतर त्रासही (skin problems in summer) कमी होतील.
थोडक्यात सांगायचे झाले तर उन्हाळ्यामधे त्वचेची रंध्रे मोकळी ठेवली पाहिजेत (prevent skin pores from clogging), त्वचेतील ओलावा टिकवून ठेवला पाहिजे (keep the skin hydrated) आणि शरीरातील उष्णता वाढू नये ह्यासाठी भरपूर पाणी तसेच इतर थंड पदार्थ ह्यांचा दैनंदिन आहारात समावेष करणे खूप महत्वाचे आहे. आशा प्रकारे त्वचेची योग्य काळजी घेतलीत तर उन्हाळ्यातही तुमाचा चेहरा तजेलदार आणि टवटवीत दिसू शकेल आणि त्वचेचे उन्हाळ्यात उद्भवणारे आजार तुम्हाला होणार नाहीत.
Do You Know?
Roughly 250 Patients Are Treated
Everyday By These Dermatologists
(You are one click away from flawless skin)
Meet our Dermatologist!
Conclusion ( निष्कर्ष )
उन्हाळ्यात त्वचेची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण कडक उन्हाचा आणि हवेतील कोरडेपणाचा त्वचेवर प्रतिकूल परिणाम होतो. त्वचेची रंध्रे मोकळी ठेवणे, ओलावा टिकवून ठेवणे, आणि शरीरातील उष्णता कमी ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे, हे सगळे उपाय नियमितपणे केल्यास तुमची त्वचा तजेलदार आणि टवटवीत राहील. काकडी, आलोवेरा, चंदन, ताक, दही ह्यासारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करून त्वचेची काळजी घ्या. उन्हात बाहेर पडताना छत्री, सन ग्लासेस आणि सनस्क्रीन वापरून त्वचेला संरक्षण द्या.
Further Reading
How to Keep Your Skin Hydrated & Healthy This Winter?
Combat winter dryness with hydration, moisturisers, and smart Winter skincare. Protect your skin with the right products and habits for a radiant, healthy glow.
How Long Does It Take for Freckles to Fade?
There are many easy ways to smooth your skin and fade acne marks at home. In this article, we’ll share home remedies and treatments with expert advice to help reduce acne marks.
How to Prevent Wrinkles and Fine Lines Naturally and Identify Early Signs of Aging
Discover how to prevent wrinkles naturally, recognize early signs of ageing, and adopt skincare habits for youthful skin. Expert tips and treatments explained.
5 Easy Ways to Remove Acne Marks
There are many easy ways to smooth your skin and fade acne marks at home. In this article, we’ll share home remedies and treatments with expert advice to help reduce acne marks.
Have thoughts? Please let us know
We are committed not only to treating you, but also educating you.