व्हेरिकोज व्हेन्स (varicose veins): पायावरच्या काळ्यानिळ्या शिरांवर उपचार
Reviewed By: Dr. Manali Shah
Updated on: 13th September, 2022
Varicose veins समस्या योग्य काळजी आणि उपचारांनी कमी करता येऊ शकते. लक्षणे ओळखून वेळेत उपचार करणे आवश्यक आहे.
Table Of Content
- व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय? (What are Varicose Veins?)
- व्हेरिकोज व्हेन्स लक्षणे (Varicose Veins Symptoms in Marathi)
- व्हेरिकोज व्हेन्स घरगुती उपाय (Varicose Veins Home Remedies in Marathi)
- व्हेरिकोज व्हेन्स वर उपचार (Varicose Veins Treatment in Marathi)
- Conclusion
व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय? (What are Varicose Veins?)
पायावरील व पावलांवरील शिरा जेंव्हा टरटरून फुगतात, निळ्या किंवा जांभळ्या रंगाच्या दिसू लागतात, आणि वळतात/पिळदार होतात, तेव्हा त्याला व्हेरिकोज व्हेन्स असे म्हणतात. बरेचदा ह्या आजारामद्धे वेदना होत नाहीत पण त्वचेचे रूप बदलते, ज्यामुळे सौंदर्यात बाधा येते. मुख्यत्वे ह्या कारणामुळे हा आजार असलेले लोक व्हेरिकोज व्हेन्स वरील उपचार शोधतात.
व्हेरिकोज व्हेन्स लक्षणे (Varicose Veins Symptoms in Marathi)
- व्हेरिकोज व्हेन्स निळ्या किंवा गडद जांभळ्या दिसतात.
- व्हेरिकोज व्हेन्स फुगीर व पिळलेल्या दिसतात ज्यामुळे त्या एखाद्या दोरी किंवा तारेप्रमाणे दिसतात.
- ज्या लोकांमध्ये हा आजार वेदनाजनक असतो, त्यांना पायांमध्ये एक जडपणा जाणवतो व पाय आणि पावले दुखतात.
- स्नायू दुखणे, पायावर सूज येणे आणि आग होणे ही व्हेरिकोज व्हेन्स ची इतर काही लक्षणे (signs of varicose veins) आहेत. खूप वेळ बसल्यास किंवा उभे राहिल्यास पायांमधील दुखणे वाढते.
- व्हेरिकोज व्हेन्सच्या भोवती खाज सुटते, व त्यांच्या भोवतीच्या त्वचेचा रंग बदलतो.
व्हेरिकोज व्हेन्स घरगुती उपाय (Varicose Veins Home Remedies in Marathi)
- व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास असल्यास पायात सैल /ढगळ कपडे घालावेत.
- बसताना, पाय उंचावर ठेवावेत व जास्त वेळ उभे राहणे टाळावे.
- मांडी घालून तसेच पाय दुमडून बसणे शक्यतो टाळावे. पाय हलवत राहणे आणि जास्त काळ एका जागी बसणे किंवा उभे राहणे टाळावे.
- आहारामध्ये काही बादल केल्यास, जसेकी flavonoids चे सेवन जास्त प्रमाणात केल्याने, व्हेरिकोज व्हेन्स वर आराम पडू शकतो.
- खारट पदार्थ खाल्ल्यास शरीरातील पाणी साठवण्याचे प्रमाण वाढते. Potassium असलेले पदार्थ खाल्ल्यास water retention कमी होते.
- आहारात fibers चे सेवन वाढवल्यास बद्धकोष्टता होत नाही., ज्यामुळे पायांमधील वाहिन्यांवर पडणारा ताण कमी होतो.
- पोहणे, चालणे, सायकल चालवणे, व योगा असे व्यायाम हलक्या पद्धतीने केल्यास, व्हेरिकोज व्हेन्सवर आराम (home remedy for varicose veins) पडतो.
- पायांना हलक्या हाताने मसाज केल्यास तेथील रक्ताभिसरण वाढते व असे झाल्यास व्हेरिकोज व्हेन्स वर आराम पडण्यास मदत होते.
व्हेरिकोज व्हेन्स वर उपचार (Varicose Veins Treatment in Marathi )
- Elastic bandage व compression stockings सारखी उपकरणे वापरल्यास व्हेरिकोज व्हेन्स मुळे होणार्या वेदनांची तीव्रता कमी होऊ शकते.
- शारीरिक व्यायाम व वजन कमी केल्यास व्हेरिकोज व्हेन्स ची तीव्रता कमी होते.
- लेसर थेरपी, स्क्लेरोथेरपी, रेडीयो फ्रिक्वेंसी अॅब्लेशन आणि अॅमब्यूलेटरी फ्लेबेक्टोमी ह्या वैद्यकीय प्रक्रिया व्हेरिकोज व्हेन्स वरील चांगले उपचार ठरतात.
- लेसर थेरपी मध्ये लेसरच्या साह्याने व्हेरिकोज व्हेन्स तापवतात, त्यामुळे त्या आकुंचन पावतात. पुण्यात ह्या उपचाराचा खर्च (varicose veins laser treatment cost in Pune) साधारण 80,000 ते 90,000 रुपयांपर्यंत येतो.
- रेडीयो फ्रिक्वेंसी अॅब्लेशन (radiofrequency ablation for varicose veins) मध्ये रेडीयो फ्रिक्वेंसी च्या साह्याने व्हेरिकोज व्हेन्स तापवल्या जातात, ज्यामुळे टिशू डॅमेज होऊन स्कार टिशू तयार होतो.
- स्क्लेरोथेरपी (sclerotherapy for varicose veins) मध्ये एक द्रव पदार्थ व्हेन्स मध्ये सोडला जातो, ज्यामुळे व्हेन स्कार होते व ह्या उपचारानंतर रक्त इतर वाहिन्यांमधून वाहू लागते. हा उपचार विषेश करून छोट्या व्हेरिकोज व्हेन्स वर परिणामकारक (excellent treatment for varicose veins) ठरतो.
- अॅमब्यूलेटरी फ्लेबेक्टोमी (ambulatory phlebectomy to treat varicose veins) ह्या वैद्यकीय प्रक्रियेमधे त्वचेमद्धे लहान चिरा पाडल्या जातात, व व्हेरिकोज व्हेन्स काढून टाकल्या जातात (varicose veins removal).
- व्हेन स्ट्रिप्पिंग ही शस्त्रक्रिया (veins stripping surgery) हा व्हेरिकोज व्हेन्स वरील अजून एक चांगला उपाय (effective medical treatment for varicose veins) आहे. ह्या उपचारपद्धतीमद्धे पायातील किंवा मांडीतील व्हेरिकोज व्हेन्स काढून टाकल्या जातात.
Do You Know?
Roughly 250 Patients Are Treated
Everyday By These Dermatologists
(You are one click away from flawless skin)
Meet Our Dermatologist!
Conclusion
व्हेरिकोज व्हेन्स बद्दल योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी एखाद्या तज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे. एखादा अनुभवी त्वचारोगतज्ञ (dermatologist) तुम्हाला व्हेरिकोज व्हेन्स ची कारणे, लक्षणे व उपचार (varicose veins causes, symptoms and treatments) हयांविषयी योग्य माहिती देऊ शकेल. तुम्हाला जर व्हेरिकोज व्हेन्स बद्दल माहिती हवी असेल किंवा ह्या आजारावर उपचार करून घ्यायचे असतील.
जर तुम्ही व्हेरिकोज व्हेन्स वर डॉक्टर (varicose veins doctor) शोधत असाल किंवा व्हेरिकोज व्हेन्स वर उत्तम पद्धतीने उपचार करून घेण्यासाठी पुण्यातील त्वचारोगतज्ञ (best varicose veins treatment in Pune) शोधत असाल, तर Clear Skin, ह्या पुण्यातील skin clinic ला आवश्य भेट द्या. तेथील अनुभवी डॉक्टर्स तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करतील व योग्य तो उपचार देतील, ज्यामुळे तुमचा आजार नक्कीच बरा होईल व तुमक्या पायावरच्या काळ्यानिळ्या शिरांवर योग्य उपचार मिळेल, ज्यायोगे तुम्हाला पुन्हा एकदा सुंदर आणी निरोगी त्वचा प्राप्ता करता येईल.
Further Reading
Comprehensive Guide to Chemical Peels for Pigmentation
Achieve even-toned, radiant skin with chemical peels at Clear Skin Clinic Pune. Safe and effective treatment for pigmentation, acne scars, and sunspots.
How to get the perfect glow: My essential morning skincare routine
Discover essential steps for a morning skin care routine to keep your skin glowing and healthy. Consult ClearSkin Pune for personalized skin care advice.
7 Tips to Brighten Dull Skin Naturally
7 proven tips to brighten dull skin naturally. Learn how to achieve a radiant complexion with simple skincare routine and lifestyle changes.
What Causes Hyperpigmentation After Acne and How Can It Be Treated?
Discover causes & treatments for post-acne hyperpigmentation. Explore skincare tips like sunscreen, topical creams, chemical peels, and laser therapy for clear skin.
Have thoughts? Please let us know
We are committed not only to treating you, but also educating you.